शौचालय अनुदान धनादेश झाले ‘बाऊन्स’

0
26

गोरेगाव,दि. 29-यशवंत पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायत हिराटोलाचे ग्रामसेवक चिखलोंडे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय तयार करणार्‍या लाभार्थ्यांना दिलेले अनुदानाचे धनादेश बाऊन्स झाल्याची तक्रार २७ जानेवारीला लाभार्थी कूमेंद्र पुना नांदगाये यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना केली आहे
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १२ हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. हिराटोलाच्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पुर्ण करुन फोटोसह माहीती दिली. या शौचालयाची पाहणी ग्रामसेवक चिखलोंडे यांनी केली व कुमेंद्र नांदगाये इतर पाच लाभार्थ्यांना १२ हजार रुपयाचे अनुदान धनादेश २७ डिसेंबर २0१६ ला दिले. या लाभार्थ्यांनी हे धनादेश महाराष्ट्र बँक गोरेगाव येथे आपआपल्या खात्यावर जमा केले व २७ जानेवारीला विड्रॉल करण्यासाठी बँकेत गेले असता बँकेने सांगितले की हिराटोलाच्या ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे जमा नाही, यामुळे हे चेक बाऊस झाले आहेत.लाभार्थी कुमेंद्र नांदगाये यांनी ग्रामसेवक चिखलोंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केल्यावर त्यांनी न्यायालयात जाण्याची तंबी दिली. यावर नांदगाये यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्याकडे लेखी तक्रार २७ जानेवारीला केली आहे.गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी सांगितले की, हिराटोलाचा ग्रामसेवक चिखलोंडे यांनी शौचालय बांधकाम अनुदान धनादेश घेऊन गेलेला नाही मग लाभार्थ्यांना धनादेश का ? देतो हा बिकट प्रश्न आहे.या बाबत माहिती घेण्यासाठी ग्रामसेवक चिखलोंडे यांच्यासी हरिणखेडे यांनी संपर्क केले पण संपर्क होवू शकला नाही.
कंत्राटदारांनी शौचालय बांधकाम तालुक्यात मोठय़ा प्रमाणात केलेले आहेत. या कंत्राटदारांना काम पूर्ण होण्याआधीच धनादेश गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी ग्रामसेवकांना देण्याची ताकीद दिली. यामुळे त्यांना धनादेश ग्रामसेवकांनी दिले.पण, ज्या लाभार्थ्यांनी स्वत: शौचालय बांधकाम केले अश्यांचे अनुदान धनादेश बाऊन्स होत आहेत. या प्रकरणाची मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी करावी व दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाही करावी, अशी मागणी कुमेंद्र नांदगाये व लाभार्थ्यांनी केली