वाळूघाटाच्या लिलावातून ५ कोटी ३२ लक्ष तर कारवाईतून ९२ लक्ष महसूल

0
10

गोंदिया,दि.२ : बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूच्या लिलावातून सन २०१६-१७ या वर्षात ३६ वाळूघाटाचा लिलाव करण्यात आला, त्यापैकी १५ वाळूघाट लिलावात गेले. यातून शासनाला ५ कोटी ३२ लक्ष ३५ हजार २८६ रुपये तर डिसेंबर २०१६ अखेर महसूल व खनिकर्म विभागाने ९७८ अनधिकृत रेती व इतर गौण खनिज प्रकरणात कारवाई करुन ९२ लक्ष १८ हजार ११८ रुपये शासनाला महसूल मिळवून दिला आहे.
१९ अनधिकृत रेती व इतर गौण खनिज प्रकरणात कारवाई करुन गन्हे नोंदविण्यात आले आहे. २१ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु असून रेतीचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक होवू नये यासाठी तालुका पातळीवर भरारी पथके गठीत करण्यात आली असून ही पथके प्रभावीपणे काम करीत आहे.
वाळू प्रकरणी ठेकेदार/लिलावधारक/वाहन मालक-वाहनचालक दोषी आढळल्यास त्यांचेविरुध्द प्रचलित नियमानुसार कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचे तसेच प्रत्येक तहसिलदाराने प्रत्येक आठवड्यातून किमान दोन अवैध गौण खनिज प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना दिले आहे. त्यामुळे वाळूचा व इतर गौण खनिजाचा नियमबाह्य उपया तसेच चोरटी वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.