शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदानासाठी १३ प्रकारचे ओळखपत्र ग्राहय

0
10

गोंदिया,दि.२ : ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षीक निवडणूकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता दरम्यान मतदान होणार आहे. या निवडणूकीत संबंधित मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी १३ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राहय धरण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार ओळखपत्राशिवाय पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, पदवी/पदविका प्रमाणपत्र छायाचित्रासह, राज्य/केंद्र/सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेले संबंधित विभागाचे ओळखपत्र, पोष्ट/बँकचे छायाचित्रासह असलेले ३१ डिसेंबर २०१६ पुर्वीचे पासबुक, संपत्तीविषयक नोंदणी, विक्रीपत्र ज्यामध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असलेले दस्ताऐवज, छायाचित्रासह असलेले रेशन कार्ड, अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्ग असल्याचे व ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी छायाचित्रासह प्रदान केलेले प्रमाणपत्र, छायाचित्रासह असलेला शस्त्रपरवाना, दिव्यांग व्यक्तीचे छायाचित्रासह प्रमाणपत्र, आधारकार्ड व स्मार्ट कार्ड आदी प्रकारच्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे.