गोंदिया फेस्टीवल निमित १२ फेब्रुवारीला गोंडी चित्रकला स्पर्धा

0
17

गोंदिया,दि.३ : जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून आता १२ फेब्रुवारीला रोजी सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोंडी आदिवासी समाजाची विशिष्ट अशी चित्रकला आहे. या चित्रकलेचा प्रचार-प्रसार व्हावा, नवोदित चित्रकारांना सुध्दा ती अवगत व्हावी यासाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबर रोजी प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेंट येथे गोंडी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत गोंदिया येथील चित्रकलेत आवड असलेल्या काही शाळांचे विद्यार्थी तसेच चित्रकला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. आता याच विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य इच्छुक चित्रकारांसाठी या गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व साहित्य सोबत आणावे. समितीमार्फत चित्र काढण्यासाठी ड्रॉईंग शिट पुरविण्यात येईल. असे आयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.