तांदळाच्या अवैध वाहतुकीने शासनाला दर महिन्याला दीड कोटीचा चुना!

0
8

गोंदिया,berartimes.com दि.६- यावर्षी शासनाच्या वतीने विकत घेतल्या जाणाèया धानाची भरडाई केल्यानंतर राज्यसरकार राईस मिलमधून तांदळाची अवैधरित्या वाहतूक करित असल्याने गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ८०० ते १०० ट्रान्सपोर्ट व्यवसायिकावर व त्यांच्यांशी संलग्न सुमारे १० हजार कुटुंबांची रोजीरोटी धो्नक्यात आली असून या अवैध वाहतुकीमुळे जे काम ७० ते ७५ लाखात व्हाय त्यासाठी शासनाला दर महिन्याला सुमारे दोन कोटीचा वाहतूक खर्च उचलावा लागत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाèयाच्या संगनमताने हा व्यवहार सुरू असल्याचा आरोप पत्र परिषदेत गोंदिया जिल्हा लोकल ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाèयानी लावला असून या संदर्भात प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
या संदर्भात त्यानी दिलेल्या माहिती प्रमाणे शासकीयनियमानुसार आंतर जिल्हा ट्रान्सपोर्ट १०० कि.मी.पर्यंतच केली जाऊ शकते तसेच वाहतूकीसाठी दर दोन वर्षानी टेंडर आमत्रित केले जातात.मात्र २००६ पासून शासनाने टेंडरच बोलाविले नाही जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायी शासनाच्या जुन्या दराप्रमाणे वाहतुक करण्यासाठी तयार असतांना गोंदिया व भंडारा जिल्ह्याबाहेरील वाहतुकदारांना प्रति टन २५०० च्या भावाने अवैधरित्या वाहतुकीचे काम दिले जात आहे असाही आरोप वाहतुकदारांनी केला आहे.या संदर्भात वाहतुकदारांनी ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी गोंदिया याना निवेदनामार्फेत संपूर्ण प्रकरण लक्षात आणून दिले. भरडाई केल्यानंतर सरळ राईस मिलमधून तांदूळ पाठविला जात असल्याने तांदळाची प्रत योग्य राहत नाही हे निर्देशनास आणून दिले.मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी मार्केqटग फेडरेशनतर्फे विकत घेतला जाणाèया धानाची भरडाई करून तो तांदूळ स्थानिक भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात जमा केला जात असल्याने जिल्ह्यातील वाहतूकदारांना काम मिळायचे.मात्रयावर्षी हा तांदूळ राईस मिलमधून सरळ बाहेर जिल्ह्यांना पाठविला जात असल्याने स्थानिक वाहतूकदारांना काम मिळत नाही. तसेच जिल्ह्यातील गोदामात ठेवलेला ३० ते ३५ हजार मेट्रिक टन तांदूळ खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या तांदळाची अवैधरित्या वाहतूक करताना ओव्हरलोडींग वाहतूक केली जात आहे व या संदर्भात जिल्हा प्रशासन व आरटीओ विभागानेही पद्धतशीर पणे डोळेझाकपणा केल्याचा आरोप व्यवसायिकांनी लावला आहे. येत्या आठ दिवसात शासनाने दखल न घेतल्यास जिल्ह्यातील वाहतूकदार तीव्र आंदोलन करतील असा इशारा असोसिएशनचे सुनील दवने, सुशील अग्रवाल, दिलीप चौरसिया, सुरज चौरसिया, दारा बैरिसाल, मुकेश हरिणखेडे, राजेश लांबा, त्रिलोकचंद qसग भाटीया, हरजीत जुनेजा, जहीरभाई, सन्नी भाटीया, राजा भाटीया यांनी दिली आहे.