चपराळा गावशिवारात अस्वलाचा संशयास्पद मृत्यू

0
12

भद्रावती दि.८-: तालुक्यातील चपराळा व कचराळा या गावादरम्यान असलेल्या शिवारात एका अस्वलाचा मृतदेह आढळून आला. या अस्वलाचा मृत्यू शेतात लावण्यात आलेल्या विद्युत तारेच्या जिवंत स्पर्शाने झाला असल्याची चर्चा दोन्ही गावात असली तरी वनविभागाने मात्र हा मृत्यू संसर्गजन्य रोगाने नैसर्गिकरित्या झाला असल्याचा दावा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या हवाल्याने केला आहे. याबद्दल परिसरात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. ही घटना ३ फेब्रुवारीला घडली असून, प्रथम वनविभाग या घटनेपासून अनभिज्ञ होता. मात्र, एका सामाजिक कार्यकर्त्याने या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर वनविभागाने शोधाशोध केल्यानंतर अस्वलाचा मृतदेह आढळून आला.