रोहयो कामावरील महिला मजूर दगावली

0
7

गडचिरोली दि.८-: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करित असताना तालुक्यातील महिला मजूर अचानक दगावल्याची घटना मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
शोभा मधुकर खोब्रागडे असे दगावलेल्या महिलेचे नाव आहे. तालुका मुख्यालयापासून १0 किमी अंतरावर असलेल्या येवली येथे रोजगार हमीचे काम सुरू होते. या कामावर महिला मजूर शोभा खोब्रागडे गेल्या होत्या. दरम्यान, दुपारच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्या चक्कर येऊन जमिनीवर पडल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी शोभा खोब्रागडे यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्‍चात २ मुले, १ मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शासनाने शोभा खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.