जिल्हा नियोजन समितीची सभा ११ फेब्रुवारी रोजी

0
7

गोंदिया,दि.१० : जिल्हा नियोजन समितीची सभा आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना व क्षेत्रबाहय योजना सन २०१७-१८ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी प्रदान करणे व जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ अंतर्गत माहे जानेवारी २०१७ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील.