कचारगड यात्रेच्या निमंत्रित मंत्र्याच्या वेगवेगळ्या आगमनाने कोलमडले नियोजन

0
18

गोंदिया berartimes.com दि.१०- आदिवासी समाजाचे उगमस्थान मानले जाणाèया सालेकसा तालुक्यातील धनेगाव जवळील कचारगड पहाडावरील कोया पुनेम महोत्सवाला गुरुवारपासून खरी सुरुवात झाली. जय सेवा, जय जंगो, जय लिंगो असा मंत्र असलेली ही यात्रा मात्र आदिवासी समाजामध्ये येणाèया राज्यातील ४८ जातींनाही एकत्र आणू शकली नसल्याची खंत या यात्रेत आलेल्या बहुतेकांना बोलतांना व्यक्त केली.ही यात्रा आदिवासी समाजाची असतांना गोंडीधर्मिय यात्रेच्या नावानी काही लोकांनी प्रचलित करुन आदिवासी समाजामध्ये येणाèया कुंवर,हलबा सारख्या इतर सजातीयांनाही सामावून घेण्यात अपयशी ठरल्याने या यात्रेचा मुख्य उद्देशच बाजुला सारला गेल्याचे बोलले जात आहे.त्यातच स्थानिक समितीला नियोजन न जमल्याने पाहुण्यांचे नियोजनच कोलमडले.
त्यातच या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री देवीqसग कुलस्ते यांनाही आजच्या कार्यक्रमात अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने यावेळच्या यात्रेचे नियोजन करण्यात स्थानिक समिती चांगलीच अपयशी ठरली.राज्यमंत्री कुलस्ते यांना मंचकासमोरील आदिवासी बांधवानी शपथ घेण्याच्या मुद्यावरुन चांगलेच घेरत तुम्ही आदिवासी आहात तर शपथ घ्या असे म्हटले.परंतु मंत्रीमहोदयांनी मी आदिवासी आहे पण सध्या शपथ घेणार नाही असे म्हणताच काही असामाजिक तत्वानी तिथे गोंधळ घालून सामाजिक व सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात विघ्न घालण्याचे काम केले.काहींच्या मते तर काही लोक हे मंचकाच्या आजूबाजूला दारु पिऊन येऊन त्यांनीच गोंधळ घातला असेही बोलत होते.त्यातच आजच्या कार्यक्रमासाठी आयोजन समितीच्यावतीने ज्या मंत्रीमहोदयांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यापैकी केंद्रिय आदिवासी विकास राज्यमंत्री वगळता कुणीही नियोजित वेळेवर न पोचल्याने मुख्य कार्यक्रमाच्या नियोजनात गडबड झाली.ना.कुलस्ते हा १२ वाजेच्या सुमारास आले तर राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ३.३० वाजता दरम्यान पोचले त्यातच जिल्ह्यातच असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे तर सायकांळी ४.१५ वाजता पोचले.हे तिन्हीमंत्री वेगवेगळे आल्याने तिघांचाही संगम होऊ शकला नाही.
विशेष म्हणजे या समितीवर प्रशासकीय कुठलेही नियंत्रण नसल्याचेही दिसून आले.गेल्या अनेक वर्षापासून लाखोचा निधी या समितीला यात्रेच्या निमित्ताने स्थानिक परिसराच्या विकासासाठी दिला गेलेला असताना विकास दिसून येत नाही.त्यातच या समितीचा लेखा जोखा सुध्दा व्यवस्थित आहे किवा नाही अशी टिकात्मक चर्चा होऊ लागली आहे.