चव्हाणांच्या तेराव्याला या, काँग्रेसच्या अंतर्गत वादाची हीन पातळी

0
32

नागपूर : निवडणुका आल्या की उमेदवारीची संधी न मिळणाऱ्या इच्छुकांमध्ये रुसवेफुगवे, नाराजी, बंडखोरी पाहायला मिळते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नागपुरात काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चक्क पत्रिका छापून नेत्यांच्या राजकीय तेराव्याचं आमंत्रण देण्यात आले आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि प्रदेश सरचिटणीस अभिजीत वंजारी यांचं 15 तारखेला राजकीय तेरावं आयोजित केल्याचं आमंत्रण देण्यात आले आहे. तसंच निकालाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला गोड जेवणाला या, असंही पत्रिकेत छापण्यात आले आहे.