30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ नाभिक संघटनेची कार्यकारिणी गठित

नाभिक संघटनेची कार्यकारिणी गठित

0
24

सडक अर्जुनी दि. 11 : महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाजातील महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चóो यांच्या प्रमुख उपस्थितीत सडक अर्जुनी सलून व्यवसाय तालुकाध्यक्ष किशोर कावळे यांच्या निवासस्थानी नुकताच घेण्यात आला. यावेळी सर्वानुमते महिला संघटनेची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात तालुकाध्यक्षा म्हणून शारदा अशोक लांजेवार, उपाध्यक्षा मोसमी उमराव सूर्यवंशी, सचिव मंगला प्रभाकर मेश्राम, सहसचिव ज्योती किशोर कावळे, नंदिनी नरेश सूर्यवंशी, कार्याध्यक्षा विमल नारायणराव सूर्यवंशी, सहकार्याध्यक्षा हिरा वामनराव सूर्यवंशी, कोषाध्यक्षा भारती सुभाष कावळे, संघटक बबिता बाबुराव सूर्यवंशी, लता प्रकाश उरकुडे, माधुरी महेश सूर्यवंशी तर सदस्या म्हणून बबली हेमंत कावळे, पुष्पा श्रीराम सूर्यवंशी, पूजा सुधीर सूर्यवंशी, मार्गदर्शक लक्ष्मी महादेव सूर्यवंशी या सर्वांची निवड झाली आहे.