32.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ सावलीत मोहा दारू सडवाची ५६८ पोती नष्ट

सावलीत मोहा दारू सडवाची ५६८ पोती नष्ट

0
31

चंद्रपूर,berartimes.com दि.१२ -सावली येथील स्थानिक किसान नगर येथील जंगल परिसरात मोहा दारू सडवाची ५६८ पोती नष्ट करण्यात आला.याची कींमत अठ्ठावीस लाख ४० हजार आहे.सावली पोलीस स्टेशन अंतर्गत किसान नगर येथील जंगल परिसरात संपूर्ण कर्मचा चान्यांसह विशेष मोहीम राबवण्यात आली. तेथून मोहा दारू सडवाच्या ५६८ पोती नष्ट करण्यात आल्या . २६ हजार ८२५ कीलो वजनाचा हा अठ्ठावीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात १० गुन्हे दाखल होत आहेत .ही मोठी कारवाई मानली जात आहे.