भाजप उमेदवाराची लैंगिक शोषणाची ‘आॅडिओ गाथा’

0
8

वर्धा : जिल्ह्यातील वायगाव(नि.) गटात भाजपश्रेष्ठींनी लैंगिक शोषण आणि गर्भपात घडवून आणले, असे गंभीर आरोप असलेले मिलिंद भेंडे यांना पक्षांतर्गत विरोध डावलून उमेदवारीची माळ घातली. ऐन निवडणुकीच्या काळात भेंडे यांचे हे कृत्य अधोरेखित करणाऱ्या ‘आॅडिओ क्लिप’ व्हायरल झाल्याने भाजपात कमालीची अस्वस्थता पसरली असून जनमाणसातही नाराजीचा सूर उमटत आहे. याच अनुषंगाने वायगाव(नि.) गटात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाचे स्टार प्रचार सावध भूमिका घेऊन असल्याचे ऐकायला मिळत आहे.

सुमारे २४ आॅडिओ क्लिप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांना गतीने ‘पोस्ट’ केल्या जात आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर भाजपश्रेष्ठींपर्यंत या आॅडिओ क्लिप पोहचल्या असून सर्वत्र याचीच चर्चा सर्वत्र रंगत आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली. तेव्हा भेंडे यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदी वर्णी लागली. फेब्रुवारी २०१६ मध्ये एका महिलेने त्यांच्याविरुद्ध आपले १२ वर्षांपासून लैंगिक शोषण करीत अनेकदा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याची तक्रार केली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भेंडेला विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान, भेंडेंना महिनाभर तुरुंगाची हवा खावी लागली. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी तर तोंडात बोटेच घातली. या आॅडिओ क्लिप पक्षश्रेष्ठींकडे पोहचविल्या जातील, असे ते म्हणाले.