25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ जिल्हास्तरीय सरपंच मेळावा उद्या

जिल्हास्तरीय सरपंच मेळावा उद्या

0
30

गोंदिया दि.१२ -: गोंदिया येथे जिल्हास्तरीय सरपंच मेळावा १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता मयूर लॉन कटंगीकला येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद््घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे असतील. खासदार प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार नागो गाणार, प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी.बागडे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपुरे, समाजकल्याण समिती सभापती देवराज वडगाये व कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीरकर उपस्थित राहतील.
याप्रसंगी सात खंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल.पुराम व गटविकास अधिकारी एस.एन.वाघाये यांनी केले आहे.