गोंदिया,दि.14 : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे होण्याच्या दृष्टीने या योजनेची कार्यपध्दती, उपलब्ध सेवा-सुविधाबाबत सर्व डिसीपीएस/NPS कर्मचारी, आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामध्ये जागरुकता व जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी कोषागार कार्यालयातर्फे 15 फे्ब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त डीसीपीस कर्मचारी व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोषगार अधिकारी दिगंबर नेमाडे यांनी केले आहे.




