23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ जि.प.व पं.स. निवडणूक दुसरा टप्पा निवडणूक आयुंक्तांनी घेतला आढावा

जि.प.व पं.स. निवडणूक दुसरा टप्पा निवडणूक आयुंक्तांनी घेतला आढावा

0
19

गडचिरोली berartimes.com दि. १६ : येत्या 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही मतदान निर्भय वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोणातून तयार रहावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिली.दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकी सोबतच राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. आज पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. या पार्श्वभूमीवर श्री. सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
गडचिरोलीत चार तालुका क्षेत्रात 21 रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, उपविभागीय अधिकारी श्री. राममुर्ती, डॉ. विपीन इटणकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, नोडल ऑफिसर जे. पी. बाबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित होते. निवडणूक आयोगाचे शेखर चन्ने यांनी आयुक्तांच्या वतीने आढावा घेतला.

blank