28.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ नाभिक संघटनेच्या बंदला यश ;अखेर ‘त्या’ आरोपीस अटक

नाभिक संघटनेच्या बंदला यश ;अखेर ‘त्या’ आरोपीस अटक

0
44

देवरी 17:: सलून व्यावसायिक राधेश्याम नत्थुलाल लांजेवार (४0) यांना त्यांच्याच सलूनमध्ये आरोपीने मारून जखमी केले होते. त्या आरोपीस तत्काळ अटक व्हावी, या मागणीचे निवेदन नाभिक संघटनेने पोलीस प्रशासनाला दिले. दरम्यान त्या घटनेच्या निषेधार्थ सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आला. अखेर रामनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली.
६ फेब्रुवारीला लांजेवार आपल्या सलूनमध्ये कार्यरत असताना आरोपीने वाद घालून त्यांना वस्तर्‍याने मारून गंभीर जखमी केले होते. या घटनेच्या निषेधार्थ १६ फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्हा नाभिक समाज संघटनेने आरोपीस अटक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून आपल्या संघटनेची एकतेची ताकद दाखवून देताच रामनगर पोलिसांनी अखेर आरोपी अतुल कागदेला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करीत आहेत.