समाजवादी अर्थकारणापेक्षा भांडवलवादी अर्थव्यवस्था देशात-माजी न्यायाधीश सावंत

0
25

नागपूर 17:: केवळ नोटा बदलवून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही. त्यासाठी व्यवस्थाच बदलणे आवश्यक असते. भारताचे संविधान समाजवादी, आर्थिक धोरणाचा पुरस्कार करते. मात्र समाजवादी अर्थकारणापेक्षा भांडवलवादी अर्थव्यवस्था देशात प्रस्थापित होत आहे. या देशातील लोकांना बेरोजगार, विषमता आणि गुलामीपासून मुक्ती पाहिजे. त्यासाठी दुसर्‍या स्वातंत्र्य युद्धाची गरज आहे. कारण मूळ प्रश्नांपासून देशातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रय▪केला जात आहे, असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व प्रसिद्ध विचारवंत पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.एम्पाल यांनी वीज कंपन्यांसमोर उभी ठाकलेली आव्हाने व स्पर्धेवर प्रकाश टाकला. यातून बाहेर पडण्याकरिता कर्मचार्‍यांच्या सहकार्याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात संजय घोडके यांनी वीज कंपन्यांनी कामगाराभिमुख धोरणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त करून अभियंत्यांवर निलंबनासारखी होणारी अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी केली. प्रास्ताविक व अहवालवाचन संघटनेचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे यांनी केले. संचालन एच. पी. ढोके यांनी केले. आभार ए. जी. पठाण यांनी मानले. यावेळी ‘ऊर्जा श्रमिक’ या मुखपत्र स्मरणिकेचे लोकार्पण न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये ‘मागासवर्गीयांचे संविधानिक अधिकार व न्यायालयाची भूमिका, विविध राज्यांतील मागासवर्गीयांचे प्रश्न’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनात देशाच्या विविध राज्यांतून जवळपास ६ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. संजय जीवने यांच्या ‘मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन’ या नाट्यप्रयोगानंतर ठराव वाचन झाल्यावर अधिवेशनाची सांगता झाली.संघटनेचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे, कार्याध्यक्ष प्रेमानंद मौर्य, मुख्य संघटक एस. के. हनवते उपस्थित होते.

न्या. सावंत म्हणाले, सध्याच्या काळात जगातील एकूणच कामगारांवर मोठी आपत्ती येऊन ठेपली आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार एकूण कामगार संख्येत ६९ टक्के कपात केली जाणार आहे. त्याला कारण म्हणजे स्वयंचलित यंत्रे आणि यंत्रमानव आहे. यामुळे जगातील कामगार अस्वस्थ आहेत. उद्याच्या पिढय़ा बेकार म्हणूनच जन्माला येणार आहेत. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आर्थिक व्यवस्था बदलणे हा एकमेव उपाय आहे.

यावेळी अभिजित देशपांडे, चंद्रकांत थोटवे, ओमप्रकाश? न्यायमूर्ती सावंत : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अधिवेशनमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झाले. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कंपनीचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे, महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, महापारेषण कंपनीचे संचालक (संचलन) ओमप्रकाश एम्पाल यांच्यासह स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील,नोटा बदलवून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही