ब्रम्हलीन घनश्याम महाराज पालखी यात्रेेचे २२ फेब्रुवारीपासुन आयोजन

0
8

गोरेगाव दि.२०:- संत कबीर मानव सेवा आश्रम अंतर्गत बालशिव सत्संग कबीर भजन मंडळ गोरेगावच्या वतीने ता २२ फेब्रुवारीपासुन तालुक्यातील विविध गावामध्ये ब्रम्हलीन घनश्याम महाराज पालखी यात्रेचे आयोजन शिवरात्री दिनानिमीत्त करण्यात आली आहे.पालखी यात्रा २२ फेब्रुवारीला गोरेगाव वरुन हिरडामाली, मोहगाव बुजरुक, सर्वाटोला, दवडीपार, धुंदाटोला, झांजिया ता २३ ला सोनी, आंबेतलाव, घुब्बेटोला, हिराटोला, चांदीटोला,२४ फेब्रुवारीला पालखी कालीमाटीवरुन तिर्थक्षेत्र अंभोरा देवस्थान ( भंडारा) येथे जाणार आहे
अंभोरा तिर्थक्षेत्र देवस्थान पुरातन असुन या ठिकाणी मराठीचे आद्यकवी मुकुंद महाराज यांनी हरिनाथ महाराज यांच्या समाधी जवळ बसुन विवेकसिंधु हा ग्रंथ लिहलेला आहे या भक्ती मार्गाच्या प्रसार, प्रचारासाठी या पालखी यात्रेचे आयोजन भागवत प्रवक्ता राजेश चाचेरे, निर्मलदास सोनवाने, बाबुलाल पटले, गोपाल येळणे,रविन्द्र कुंभरे, हिरा धपाडे, तिमा चाचेरे, लेखु रहांगडाले, सुनील राऊत, दिलीप कटरे, दादु चाचेरे, सिका मोटघरे, सुधाकर देव्हारे, अजय कोठेवार यांच्या उपस्थित या पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या पालखी यात्रेत सर्व भाविकांनी उपस्थित व्हावे असी विनंती राजेश चाचेरे यांनी केली आहे