किरसान्स इंटरनॅशनल शाळेतील दोनशे आदिवासी विद्यार्थ्यांना त्वचारोग

0
15

गोंदिया दि.२०-: आदिवासी विकास पÑकल्प कार्यालय देवरींतर्गत नामांकित शाळांत पÑवेश या योजनेखाली हिरडामाली येथील किरसान्स इंटरनॅशनल पब्लीक शाळेत २८५ आदिवासी निवासी शिक्षण घेत आहेत. यापैकी ८० विद्यार्थ्यांना त्वचेचा रोग जडला. हा रोग बरा होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे शाळा पÑशासनाने आपली जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांच्या पाल्यांना घरी पाठविले. शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा पÑकार झाल्याचा आरोप पालकांनी केला. दोन आठवड्यांपासून हा पÑकार सुरू असताना शाळा पÑशासन हवन-पूजनात व्यस्त होते, असा आरोपही होत आहे.
आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने राज्य शासनाने नामांकित शाळांमध्ये आदिवासींच्या पाल्यांना शिक्षण देण्याची योजना आखली. त्या योजनेची अमलबजावणी देखील संपूर्ण राज्यात झाली. देवरी येथे असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी विकास पÑकल्प कार्यालयांतर्गत गोरेगाव येथील नामदेवराव किरसान यांच्या संस्थेद्वारे संचालित किरसान्स इंटरनॅशनल पब्लीक शाळेत २८५ विद्यार्थ्यांना पÑवेश देण्यात आले आहे. या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून डोळ्याला खाज येवून डोळे आणि चेहºयावर सूजन येते. त्याच बरोबर फोडे येवून त्याठिकाणची त्वचा निघत आहे. या विद्यार्थ्यांची तपासणी डॉ. राहूल बिसेन यांनी केली. त्यांच्या मते हा आजार संसर्गजन्य असून त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात जे-जे येतील, त्यांना देखील हा आजार जडू शकतो. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन आठवड्यांपासून हा पÑकार सुरू असताना शाळा पÑशासनाने जाणून याची वाच्यता बाहेर केली नाही. पालकांना याची माहिती होताच त्यांनी लगेच शाळेत धाव घेतली. परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच शाळा पÑशासनाने पालकांना पाचारण करून आपल्या पाल्यांना घरी घेवून जाण्याचा सल्ला दिला. गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा व्यवस्थापनाने चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यापेक्षा १९ तारखेच्या रात्री शाळेत हवन केल्याचे समजते. याच शाळेत पÑवेशाच्या वेळी शाळा व्यवस्थापनाने काही विद्यार्थ्यांना पÑवेश नाकारला होता. त्यामुळे हे शाळा व्यवस्थापन केवळ पैसे लाटण्याच्या उद्देशानेच विद्यार्थ्यांना पÑवेश देते, की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे बुटीबोरी येथील नामांकित शाळेत पÑवेश या योजनेंतर्गत एका शाळेत आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण केले जात असल्याची बातमी ताजी असताना हा पÑकार आता हिरडामाली येथील किरसान्स इंटरनॅशनल पब्लीक शाळेत घडल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आदिवासी विभाग पÑशासन आणि शाळा व्यवस्थापन यांच्या संगणमतामुळे खेळ चालू असल्याचा आरोप सुरू झाला.