पाच लाखाच्या निधीवरील नजरेने वाजले जिल्हास्तरीय मेळ्याव्याचे बारा

0
11

khemendra katre
गोंदिया,berartimes.com दि.२०-गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज(दि.२०)कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती यांचा मतदारसंघ असलेल्या रतनारा जिल्हा परिषद गटातील दवनीवाडा येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनाकडे बघितल्यावर मात्र हा मेळावा शेतकरी व कृषीमित्राएैवजी या मेळाव्याच्या निधीवरच आयोजकांची नजर होती असे चित्र बघावयास मिळाले.
त्यातच नियोजन शुन्यतेचा अभाव अवाजवी दराने घेतलेले जेवणासह मंडपाचे(दीड लाखाचे जेवण,दीड लाखाचे मंडप व २० हजाराचे बिस्किट) दराने खर्चावरील नियंत्रणाचे पितळच उघडे पडले.काही पदाधिकाèयांनी निव्वळ मी मंत्र्यांना आणतो काय होते हा रुबाब दाखविण्यासाठी मात्र इयत्ता दहावीच्या मुलांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचेही भान तर ठेवलेच नाही बारावीच्या मुलांचेही प्रवेशपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी या मेळाव्यामुळे वितरित न केल्याने त्या विद्याथ्र्यांना मानसिक त्रास आयोजक अधिकारी व पदाधिकारी यांच्यामुळे सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली.अशा ढिसाळ नियोजनासाठी पुढाकार घेणाèयांवर शासनाने अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.अधिकाèयांवर आपल्या पदाचा व राजकीय नेत्यांचा दबाव घालून निव्वळ मार्च महिन्याआधी निधी खर्च करायचा म्हणून कुठला पदाधिकारी एैनवेळेवर व मनमर्जीने काम करून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाèयांवर सुद्धा सरकारने वचक ठेवण्यासाठी आचारसqहतेची गरज निर्माण झाल्याचे आजच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा मेळाव्यावरुन दिसून आले.
जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन असले तरी तालुकास्तरीय मेळाव्याला येतात असे शेतकरी आले नव्हते.या मेळाव्याचा प्रचार प्रसार सुद्धा करण्यात आला नाही.मात्र प्रचार प्रसिद्धीच्या नावे असलेला खर्च मात्र व्यवस्थितरीत्या विभागप्रमुख हे पत्रक काढले असे बॅनर लावले म्हणून काढून रिकाम्या खिशांना भरण्याचा प्रयत्न करणार नाही असे कुठे होणार.प्रसार व प्रचारासाठी असलेल्या निधीतून शासकीय दराने वृत्तपत्रांना जाहिराती देऊ असे तर कधीच या अधिकारी व पदाधिकारी यांना वाटत नाही,पण खर्च मात्र व्यवस्थितरीत्या केला जातो.या मेळाव्यासाठी ३ लाख रुपये पशुसंवर्धन विभाग व २ लाख रुपये कृषी विभागाकडून देण्यात आले अशा पाच लाख रुपयांतून हा मेळावा घेण्यात आला.ज्याचे साधे निमंत्रण वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व ई मिडियाच्या प्रतिनिधींना देण्याचे साधे सौजन्य जिल्हा परिषदेचे अधिकारी दाखवू शकले नाही.
शाळेच्या आवारात हा मेळावा घेऊन विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यास बाध्य ठरलेले मात्र शिक्षणाचा दर्जाखालावत चालले असे सांगून शाळा व्यवस्थापन समित्यांना पत्र देणारे तत्पर मुकाअ यांच्याही लक्षात शाळेच्या आवारात हा कार्यक्रम साजरा करताना कसे खटकले नाही हा सुद्धा त्याठिकाणी चर्चेचा विषय झालेला होता.एकीकडे आपणच दर्जा खालावल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे आपल्याच उपस्थितीत मुलांना कार्यक्रमासाठी मंडपात बसवायचे हा कुठला प्रकार असे बोलले जाऊ लागले आहे.