आपत्तीग्रस्तांना आमदार पुराम यांच्या हस्ते धनादेश वाटप

0
16

आमगाव दि.२५ : तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसानभरपाई धनादेश तहसील कार्यालय येथे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना सोपविण्यात आले.आमगाव तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी हंगामी पीक मूळभाजी, फळाची शेती केली. परंतु वातावरणातील बदलाने शेतकर्‍यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. तालुक्यातील दहा शेतकर्‍यांना याचा फटका बसला. त्यांचे पीक हातून गेल्याने त्यांनी शासनाकडे मदतीचा अर्ज सादर केला होता. या शेतकर्‍यांचे ८.२0 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचे ९0 हजार ४८0 रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी तहसीलदार राठोड, यशवंत मानकर, सरोज कोसरकर, राकेश शेंडे, कमलेश चुटे, अंजली जांभुळकर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार संजय पुराम यांनी शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने शासनाची मदत देण्याचे कार्य सुरू आहे. अनेक योजना शेतकर्‍यांसाठी फलदायी ठरत असून शेतकर्‍यांचे मनोबल उंचावत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.