सुभाष बागेत साकारतेय ‘ग्रीन जीम’

0
13

गोंदिया दि.०5मार्च: शहरातील सुभाष बागेतील हिरवळीत फेरफटका मारणाऱ्यांना आता शारिरीक व्यायामाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. कारण बागेत ‘ग्रीन जीम’ साकारत असून त्याला लाभ सर्वांना घेता येणार आहे. २.९० लाख रूपयांचा यासाठी खर्च केला जात आहे.‘ग्रीन जीम’ मध्ये आठ प्रकारचे साहित्य लावण्यात येणार आहेत. यामध्ये बॅक एक्सटेंशन, बॅलेंसींग, चेस्ट प्रेशर, शोल्डर प्रेशर, टिष्ट्वस्टर, वॉकर, डबल क्रॉस व सायकलींगचा समावेश आहे.मोकळ््या जागेत लावण्यात आले असल्याने कुणीही यावर शारिरीक व्यायाम करू शकतील. विशेष म्हणजे महिला या जीममध्ये व्यायाम करू शकतील.‘ग्रीन जीम’चे हे काम कौतूकास्पद असतानाच नगर परिषद प्रशासनाचे चिमुकल्यांच्या क्रीडा साहीत्याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
मोकळ््या जागेत लावण्यात येत असलेल्या क्रीडा साहीत्यांना ‘ग्रीन जीम’ म्हटले जाते. याचे काम नागपूरच्या एका एजंसीला देण्यात आले आहे.गज्जू नागदेवे यांना ही जबाबदारी देण्यात आली असून शनिवारी (दि.४) बागेत जीममधील साहीत्य बसविण्याचे काम करण्यात आले.
शहरात एकमात्र सुभाष बाग असून शहरातील प्रत्येकच भागातून नागरिक येथे येतात. मोक ळ््या वातावरण व हवेत काही काळ घालविण्यासाठी तसेच फेरफटक्यातून आपले आरोग्य सांभाळण्यासाठी बागेत नागरिकांची गर्दी असते. सकाळी व सायंकाळीही यामुळेच आता बागेत नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. शिवाय आपल्या चिमुकल्यांना घेऊन येणारे पालकही आता बागेत दिसताहेत. यात चिमुकल्यांपासून तरूण ते वृद्धांचाही समावेश आहे. आतापर्यंत फक्त फेरफटका मारूनच या सर्वांना परतावे लागत होते.