कृषिभवन शेतकर्‍यांसाठी प्रगतीचे केंद्र ठरावे : मुनगंटीवार

0
23

चंद्रपूर दि.12:शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. शेतकर्‍साठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषिभवन शेतकर्‍याच्या प्रगतीचे केंद्र व्हावे, शेतकर्‍च्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कृषिभवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणो म्हणून आमदार नानाजी शामकुळे, अँड़ संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे आदी उपस्थित होते.
शेतकर्‍यांचा शासनाच्या तिजोरीवर पहिला हक्क आहे. आजही शेतकर्‍यांशिवाय कोणीही अन्न निर्माण करू शकत नाही. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी शासनाने दुप्पट तरतूद केली आहे. शेतकर्‍यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावे, हीच यामागची भूमिका आहे. शेतकर्‍यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती करू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणार्‍या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही. भविष्यात शेतकर्‍यांना सिंचनाच्या पाण्याची कमतरता पडणार नाही, असे पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी केद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकर्‍यांच्या विविकासाठी सकारात्मकदृष्टीने पाठपुरावा करून राबवा. युरीयाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तीन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बिटी बियाणे, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे अहीर यावेळी म्हणाले. यावेळी आ. नानाजी शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांनी केले.
२ कोटी ८१ लाख रुपये खर्च करून ही अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरावर व चंद्रपूर तालुकास्तरावर कार्यालय असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी इमारतीत स्वत्तंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विविध सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकरी तथा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.