भरारी पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा

0
15

भंडारा दि. 17: येथील जे.एम. पटेल महाविद्यालयातील बारावी परीक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी भरारी पथक प्रमुख व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आले असता त्यांनी केंद्र संचालक डी.टी. गौपाले यांना व प्राध्यापकांना अपमानित केले. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विजुक्टा जिल्हा शाखेने केली आहे.
सध्या सर्व बारावी, दहावी बोडाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर सुरू आहेत. परीक्षा केंद्र क्रमांक १०१ जे.एम. पटेल महाविद्यालयात बारावी परीक्षेचा विज्ञान विषयाचा पेपर सुरू होता. जिल्हाधिकारी भंडारा यांनी स्थापन केलेल्या भरारी पथकापैकी एक पथक प्रमुख जिल्हा कृषी विकास अधिकारी परीक्षा केंद्राला भेट देण्यासाठी आले. तिथे पथकांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली त्यांना काही मिळाले नाही. पथकप्रमुख या अधिकाऱ्याने परीक्षा केंद्र संचालकांनी अपशब्द बोलून अपमानित केले.या प्रकाराचा शिक्षक संघटनानी निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा विजुक्टा अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.