कनेरी येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी तथा पशुपालन मेळावा

0
10

सडक अर्जुनी, दि. 25 -शेतकèयांकडे पूर्वी गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. मात्र वाढत्या यांत्रिकरणामुळे दिवसेंदिवस पशुंची संख्या रोडवत चालली आहे. कृषी प्रधान असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शेतकèयांनी जर पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनावर भर दिला, तर त्यांची आर्थिक उन्नती निश्चित होईल. याशिवाय शेतीला आवश्यक असलेले घटकही सहज उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकèयांनी आर्थिक प्रगतीसाठी पशुपालनावर भर द्यावा, असे आवाहन जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे यांनी केले.
त्या २५ मार्च रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कनेरी (राम) येथे जिल्हा वार्षिक योजनांतर्गत तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी तथा पशुपालक मेळाव्याप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्या माधुरी पातोडे, शिला चव्हाण, गोंदियाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक,पं.स. सदस्या गिरधारी हत्तीमारे, गायत्री येरले, राजेश कठाणे, गिता टेंभरे, जलशीला जोशी, इंदू परशुरामकर, प्रमिला भोयर, सुधाकर पंधरे, कनेरीच्या सरपंचा इंदू मेंढे, उपसरपंच प्रेमराज मेंढे यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कविता रंगारी यांनी ना. राजकुमार बडोले यांचे कनेरी ग्राम हे दत्तक असल्याचे सांगत या क्षेत्रातील शेतकèयांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन सदैव पाठीश असल्याचे सांगितले. यावेळी माधुरी पाथोडे, अनिल गजभिये, राजेश वासनिक यांनीही पशुधनाचे महत्व सांगताना समायोचित विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सडक अर्जुनी पं.स. चे पशुधन विकास अधिकार बबन कांबळे, संचालन डॉ. येडेवार तर आभार रमेश भांडारकर यांनी मानले. यावेळी पशुपक्ष्यांची अ ते ह अशी गटनिहाय विभागनी करून प्रत्येक गटातील उत्कृष्ठ पशुंना व पक्ष्यांना अनुक्रमे १ ते ३ पारितोषिक देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येन गौपालक व शेतकरी उपस्थित होते.