ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ ११ एप्रिल रोजी

0
8

गोंदिया,दि.२६-राष्ट्रीय ओबीसी महासंघातंर्गत येणाèया गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघाच्या झालेल्या मासिक बैठकीत(दि.२५) स्थगित करण्यात आलेली ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ येत्या ११ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.ही सभा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्यालयात शनिवारला पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वèहाडे हे होते.बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, विनायक येडेवार, पी डी चौहान,महासचिव शिशिर कटरे,प्रसिद्दी प्रमुख चंद्रकुमार बहेकार,डॉ.संजिव रहांगडाले,श्री बिसेन,श्री कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत ओबीसी सभासद नोंदणी अभियानाची सुरवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी तालुका मुख्यालयी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कार्यक्रम घेऊन करण्यात येणार आहे.तर जिल्हा मुख्यालयी हाच कार्यक्रम ११ ते १४ एप्रिल पर्यंत जिल्हा कार्यालयासमोर घेण्याचे सर्वसमंतीने ठरविण्यात आले.तसेच येत्या ७ ऑगस्टला दिल्ली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय ओबीसी महाधिवेशनात सहभागी होण्यासाठी गावपातळीवर संघटन तयार करुन माहिती व प्रचार प्रसार करण्यावर भर देण्यात आले.राज्यसरकारने ओबीसी मंत्रालयाला दिलेला निधी हा लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावे तसेच जनगणना करण्यात यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसभांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यावरही चर्चा करण्यात आली.