सभापती कटरेंना पदमुक्त करा अन्यथा आंदोलन करु-राष्ट्रवादीचा इशारा

0
24

अति.जिल्हाधिकाèयाना दिले निवेदन
गोंदिया,दि.६ : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता. ३) झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सभापती पी. जी. कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सुनीता मडावी यांना पाण्याने भरलेला काचेचा ग्लास फेकून मारला. एवढेच नव्हे तर, जातिवाचक शब्दप्रयोगाचा वापर केला. या प्रकरणी श्रीमती मडावीनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कटरेंविरूद्ध अ‍ॅटड्ढॉसिटीचा गुन्हा नोंदविला.म मात्र,त्यांना अटक केली नाही. तथापि, कटरे यांना ताबडतोब अटक करावी, त्यांना पदमुक्त करावे, या मागणीकरिता मोठे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.सोबतच यासंबधिचे एक निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे नावे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची भेट घेऊन दिले. सोबतच पोलिसांनी चुकीचे कलमे लावून राष्ट्रवादीच्या सदस्यावर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीचाही निषेध नोंदविला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला दुपारी एक वाजता सुरवात झाली होती. पाणीटंचाईवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर शिक्षण विभागाचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर, ३.४५ वाजता भोजन अवकाश झाला. दीड ते दोन तास उशिरा म्हणजे सायंकाळी सहा वाजता सभेच्या कामकाजाला सुरवात झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि. प. सदस्या सुनीता मडावी यांना करारनामा झालेल्या वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे प्रशासकीय मान्यतेची झेरॉक्स प्रत सभापती कटरे यांनी दिली. ही प्रत मला नको असे म्हणून, त्या प्रत द्यायला मचकावर चढल्या. याचवेळी सभापती कटरे यांनी सदस्या मडावी यांना पाण्याने भरलेला ग्लास फेकून मारला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला इजा झाली. एवढेच नव्हे तर, जातिवाचक शब्दप्रयोगदेखील केला. सभागृहात जातीवाचक शब्दाचा वापर करणे हे सभागृहाच्या कामकाजातील असवैंधानिक प्रकार असल्याने आणि पदाधिकारीच जर अशा शब्दांचा वापर करीत असेल तर ते योग्य नसल्याने त्यांना पदावरुन काढण्यात यावे अशी भूमिका माजी आमदार दिलीप बनसोड यांनी पत्रकारपरिषदेत मांडली.सोबतच सभापती कटरे यांच्यावर विनयभंगाचादेखील गुन्हा दाखल करण्यात यावे असे सांगत जि.प.अध्यक्षा श्रीमती मेंढे यांनी ईटेंडरप्रकियेपासून वाचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ईमारतीचे तुकडे करुन रंगरंगोटीचे काम आपल्या हितसंबधींयाना देण्यासाठी केलेला प्रकारही उजेडात आणला.त्यावर सुध्दा विभागीय आयुक्तांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले.पत्रपरिषदेत जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.उपाध्यक्षांनी वाटप केलेल्या ३०५४ च्या कामाचे पत्र वेळी रद्द करण्यासाठी अध्यक्षांनी सीईओला दिलेल्या पत्राबद्दल सांगितले की गोंदिया विधानसभा मतदारसंघातील कामे आधीच वाटली गेल्याने त्या कामाबद्दल भाजप व काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या भांडणाला बाजुला सारण्यासाठी कैलास पटले यांनी म्हटलेल्या झोलबा पाटलाच्या वाडा या शब्दाला घेऊन वाद तयार करण्याचे काम करण्यात आल्याचे सांगत यापुर्वी सुध्दा श्रीमती मडावी यांना सभापती कटरे यांनी आपल्या कक्षात महिला सदस्यासमोर अपशब्द वापरल्याचे कार्यवृत्तात नमुद असल्याचे सांगितले.सोबतच महिला सभापतीनी सुध्दा अपशब्दाचा वापर केला तेव्हा जि.प.अध्यक्षा गप्प बसून आपल्या पक्षाच्या पदाधिकाèयांनी वापरलेल्या अपशब्दाला सवैंधानिक दर्जा देऊन चुकीच्या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.यापत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सदस्य सुनीता मडावी, दुर्गा तिराले, कैलास पटले,सुरेश हर्षे,मनोज डोंगरे, ललिता चौरागडे,जियालाल पंधरे,रमेश चुर्हे,विणा बिसेन,सुखराम फुंडे,मुक्तानंद पटले,अशोक शहारे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

कटरेंवर कारवाई न झाल्यास आत्मदहन : सुनीता मडावी
जातिवाचक शिवीगाळ करून अंगावर धावून येणाèया सभापती कटरेंवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण आत्मदहन करू, असा इशारा सुनीता मडावी यांनी पत्रपरिषदेत दिला.