खोकरला येथे महिला ओबीसी सेवा संघाची स्थापना

0
5

भंडारा,दि.७- भंडारा जिल्ह्यातील खोकरला येथे महिला ओबीसी संघाची स्थापना जिल्हा ओबीसी सेवा संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजुषा बुरडे,उपाध्यक्ष श्रीमती पडस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.कार्यकारीणीमध्ये अध्यक्षपदी आशा बाबरे यांची निवड करण्यात आली.तर सचिवपदी वर्षा सारवे,कार्याध्यक्षपदी सुनिता नागपुरे,सहसचिव शारदा बारस्कर,उपाध्यक्ष सीताबाई बांते,माधुरी आस्वले,अनिता बांते,वनिता डोळस,सहसचिव भारती सारवे, सदस्यामध्ये सोल चुटे,वंदना सारवे,रेखा सोनवाने,बोरकरताई यांची निवड करण्यात आली.यावेळी श्रीमती बुरडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना ओबीसी समाजातील महिलावर होणारे अन्याय व संघटनेचे उदिष्ठ यावर माहिती दिली. संचालन व प्रास्ताविक श्रीमती पडसकर यांनी केले.तर आभार श्रीमती बाबरे यांनी मानले.नव्या कार्यकारिणीचे ओबीसी सेवा संघ जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर,भैय्याजी लांबट,गोपाल देशमुख,तुलसीराम बोंद्रे,अर्जुन सुर्यवंशी,रमेश सहारे,संभु बांडेबुचे,सुधाकर मोथरकर,डॉ.शैलेश कुकडे आदींनी अभिनंदन केले.