बहिणीच्या लग्नाच्या दोन दिवसांपूर्वीच भावाचा मृत्यू

0
16

आमगाव,दि.१८ : बहिणीच्या लग्नाचा मंडप आणण्यासाठी जंगलशिवारात गेलेल्या भावाचा झाडाच्या फांद्या कापत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आमगाव तालुक्यातील गोरठा येथे घडली. संजय बिसराम बोहरे असे मृतकाचे नाव आहे.
संजयच्या बहिणीचे लग्न दोन दिवसांनी, १९ एप्रिल रोजी असल्याने संजय आपल्या सहकाèयांसह जंगलात बहिणीच्या लग्न समारंभासाठी लागत असलेल्या झाडाच्या फांद्यांसाठी (हिरवा मंडप) गेला होता. अगदी सकाळीच ही मंडळी जंगलात गेली होती. अशात मंडपावर टाकण्यासाठी छोट्या फांद्यांची गरज असल्याने संजय झाडाच्या फांद्या कापत असताना झाडाजवळून विजेचा खांब व तार गेल्याने संजयकडून कापण्यात आलेली फांदी विजेच्या तारेवर पडली. यावेळी संजयने ती फांदी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा जिवंत तारेशी संपर्क आला. यावेळी त्याला शॉक लागल्याने तो खाली कोसळला.दरम्यान, त्याच्या सहकाèयांनी घटनेची माहिती संजयच्या कुटुंबीयांना देऊन त्यास आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन केला.