24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home राजकीय भंडारा जिल्हा शिवसेनेची बैठक शुक्रवारला

भंडारा जिल्हा शिवसेनेची बैठक शुक्रवारला

0
24
तुमसर दि.18: शिवसेनेच्या वतीने जिल्हा बैठक २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता यूनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीबद्दल चर्चा, बावनथळी सिंचन प्रकल्पाचा पाणी, पेंच सिंचन प्रकल्पाचा पाणी, चांदपुर जलाशयाचा पाणी, वैनगंगा नदीचा पात्रेमध्ये संजय सरोवर सिंचन प्रकल्पाचा पाणी, गोसीखुर्द सिंचन प्रकल्प या प्रकल्पांचा पाणी नहरामध्ये व नदीपात्रामध्ये सोडण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी केले आहे.