24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गुरुवारला बीआरएसपीचे बंद सीटीस्कनसाठी आंदोलन

गुरुवारला बीआरएसपीचे बंद सीटीस्कनसाठी आंदोलन

0
33

गोंदिया,दि.18-गोंदिया येथील शासकीय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात गेल्या अनके वर्षापासून बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनला सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी्च्यातीने गुरुवारला(दि.20)धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.गोरगरीब तसेच ग्रामीण व शहरी रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागते.खासदार,पालकमंत्री,आमदार व जि.प.सदस्य हे निवडून आले परंतु त्यांनी समस्याकडे लक्ष न दिल्याने जनतेला त्रास सहन करावे लागत आहे.या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा बीआरएसीपच्यावतीने गुरुवारला जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.याआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सुधाकर शिवणकर,प्यारेलाल जांभुळकर,प्रफुल डोंगरे,दिपेन वासनिक,संजय बोहरे,डी.एस.मेश्राम आदींनी केले आहे.