कुख्यात हाजी गॅग पोलिसांच्या ताब्यात

0
16

चंद्रपूर दि.20: एकीकडे चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्ह्यातील कुख्यात हाजी गॅग मंगळवारी रात्री मोठा गुन्हा करण्याची तयारी करण्यात व्यस्त होती. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी हॉटेलला घेराव घालून नऊ आरोपींना अटक केली.अटक केलेल्या आरोपीमध्ये हाजी शेख सरवर (३६) घुग्घुस, संतोष उर्फ विक्की दुसाने (२४) गडचांदूर, जयवंत पाईकराव (२८) घुग्घुस, आनंद कांबले (२४) दुर्गापुर, अक्षय कुंटलवार (२२) घुग्घुस, शेख गौस बाबा (१८) घुग्घुस, मोहम्मद शादाब (२६) बल्लारपूर, सलमान उर्फ राज सलीम खान (२३) बल्लारपूर व मोहम्मद वखार हबीब शेख (२३) चंद्रपूर यांचा समावेश आहे.

चंद्रपुरात मनपा निवडणूक असल्यामुळे मंगळवारला रात्री आॅपरेशन आॅलआऊट मोहिम राबविण्यात येत होती. रात्री एक वाजताच्या दरम्यान शहर पोलिसांना एका हॉटेलमध्ये गुंड प्रवृत्तीचे ८ ते ९ जण असल्याची माहिती मिळाली. यांची तपासनी करण्यासाठी शहर पोलिसांची एक तुकडी हॉटेलमध्ये गेली. कोणाला काही कडण्याच्या आत पोलिसांनी बालाजी वॉर्डातील रिशा हॉटेलला घेराव घातला. आणि हॉटेलच्या रुम नंबर ३०६ चा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडल्याबरोबर पोलिसांनी सर्च मोहीम सुरु केली. त्यावेळी आतील सर्वजण पळ काढण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र पोलिसांनी संपूर्ण हॉटेलला घेराव घातला असल्यामुळे ते अपयशी ठरले. यावेळी पोलिसांसोबत हॉटेलमधील युवकांशी झटापट झाली. त्यामध्ये तीन पोलीस जखमी झाले.त्यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक धारधार खंजर, चाकू, एक दोर, मिरची पावडर, बिअरच्या दोन बाटला आदी सामान जप्त केले