लातूरमध्ये भाजपा आघाडीवर

0
12
चंद्रपूर/लातूर, दि. 21 – राज्यातील चंद्रपूर, परभणी आणि लातूर या तीन महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर होत आहेत.  सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये महापालिकेच्या 70, परभणीत 65 आणि चंद्रपूरमध्ये 66 जागा आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातून येतात. त्यामुळे चंद्रपूरचा निकालही महत्वाचा आहे.
लातूर जिल्हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. पण नगरपालिका निवडणुकांमध्ये इथे काँग्रेसला झटका बसला होता. आता महापालिका निवडणुकीच्या निकालातही इथे असेच चित्र दिसत आहे. लातूरमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर दिसून येत आहे. भाजपा सध्या इथे 23 तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे.
परभणीमध्ये काँग्रेस 8, राष्ट्रवादी 3 तर, शिवसेना-भाजपा प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. चंद्रपूरमध्ये भाजपा 4 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. या तिन्ही महापालिकांसाठी बुधवारी मतदान झाले होते. चंद्रपूरमध्ये 57 टक्के, परभणीमध्ये 70 तर, लातूरमध्ये 60 टक्के मतदान झाले होते. तिन्ही महापालिका क्षेत्रात मिळून 201 जागा असून 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत.