चंद्रपुर महापालिकेवरही कमळ फुलले

0
9

चंद्रपूर,दि.21: लातूरपाठोपाठ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातही भाजपने कमळ फुलवले. भाजपने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली.भाजपने 66 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला अवघ्या 13 जागांवरच समाधान मानावे लागले.महत्त्वाचे म्हणजे चंद्रपुरात बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाने तब्बल 7 जागा जिंकल्या.चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या 17 प्रभागातील 66 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात होते.

चंद्रपूर महानगरपालिका निकाल 2017

  • भाजप – 38
  • काँग्रेस – 13
  • बसपा – 07
  • राष्ट्रवादी – 02
  • शिवसेना – 02
  • मनसे – 02
  • अपक्ष – 02
  • 2012 महापालिका निवडणुकी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 26 जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यावेळी भाजपाला 18 आणि शिवसेनेला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 4, मायावतींच्या बसपाला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली होती.