37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आ. बच्चू कडूंचा विभागीय कार्यालयात ठिय्या

आ. बच्चू कडूंचा विभागीय कार्यालयात ठिय्या

0
16

blank

अमरावती,दि.25: आमदार बच्चू कडू यांनी तूर खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी अमरावती विभागीय कार्यालयातच  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली.सरकारने 22 एप्रिलनंतर नाफेडतर्फे सुरु असलेली तूर खरेदी बंद केली आहे. एका बाजूला अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक असताना, खरेदी बंद झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारनं तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.सरकारच्या तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध करत प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे.

blank