26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राजकीय छत्तीसगडचे मुख्यमंत्री नक्षलींच्या मदतीने निवडणूका जिंकतात – दिग्विजय सिंह

छत्तीसगडचे मुख्यमंत्री नक्षलींच्या मदतीने निवडणूका जिंकतात – दिग्विजय सिंह

0
29
नवी दिल्ली, दि. 25 – नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असून नक्षलवाद्यांबरोबर तडजोड करुन भाजपाने तेथे विजय मिळवला आहे असे विधान दिग्विजय यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. दिग्विजय सिंह यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. सुकमामधील नक्षलप्रभावित भागामध्ये राहणा-या आदिवासी नागरीकांना विश्वासात घ्या. त्यांचा विश्वास संपादन केला तरच, तिथे प्रशासन चालवता येईल असे दिग्विजय म्हणाले.
blank