सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही – राजनाथ सिंह

0
16

रायपूर, दि. 25 – छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जवानांवर झालेला हल्ला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचं म्हणत जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंग संतप्त दिसत होते. नक्षलवाद्यांच्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्विकारचे त्यांनी सांगितले आहे.

जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या राजनाथ सिंह यांनी यावेळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह उपस्थित होते.बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आदिवासी लोकांना आपली ढाल बनवून हल्ला केल्याचं त्यांना यावेळी सांगितलं. ‘ आतापर्यंत नक्षलवाद्यांवर जी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे ते घाबरले आहे. यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासंबंधी धोरणावर पुन्हा विचार केला जाईल. 8 मे रोजी दिल्लीत यासंबंधी बैठक होईल. या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी सामील होतील’, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.

नक्षलवादी असल्याची जाणीव झाली होती. काही जण झाडामागून येत होते. ग्रामस्थ गायी चारण्यासाठी तर काही चौकशीसाठी येत होते. याआधी असे काही झाले नव्हते. जेवणानंतर आम्ही गटागटाने बसलो होतो. ग्रामस्थ आले आणि १५ मिनिटांत गोळीबार सुरू झाला.
– कॉन्स्टेबल सौरभ कुमार