39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ अर्जुनीमोरगाव पंचायत समितीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार

अर्जुनीमोरगाव पंचायत समितीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार

0
33

blank

गोंदिया,दि.25- केंद्र सरकारच्या पंचायत विभागाच्यावतीने राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्यसाधू उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील राम मनोहर लोहिया विश्वविद्यालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय पंचायत राजमंत्री नरेंद्रसिह तोमर यांच्याहस्ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समितीला २५ लाख रुपयाचा पंडित दिनदयाल पंचायत राज सशक्तीपुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्काळ सोहळ्याला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला,उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्य,दिनेश शर्मा,पंचायत राज्यमंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.अर्जुनी मोरगावचे सभापती अरqवद शिवणकर ,उपसभापती आशा झिलपे,गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार व विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी हा पुरस्कार स्विकारला.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोन पंचायत समित्यांची निवड झाली होती.त्यामध्ये अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचा समावशे होता.

blank