खा.पटोलेंच्या हस्ते रेल्वेस्थानकावर लिफ्टचे लोकार्पण,महाराष्ट्र एक्सप्रेला हिरवी झेंडी

0
9

गोंदिया,दि.01- गेल्या अनेक दिवसापासून प्रवाशांची असलेली मागणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने गोंदिया रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसला आज महाराष्ट्र दिनाचेनिमित्त साधुन होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सोडण्यात आले. तसेच दिव्यांग आणि वयोवृद्ध प्रवाशांकरिता बसविण्यात आलेल्या लिफ्टचे लोकार्पण खासदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व सामान्य लोकांकरिता स्वयंचलित पायऱ्या(एक्सेलेटर) बसविण्यात येणार असल्याची माहिती खासदार पटोले यांनी यावेळी दिली.

पटोले यांनी खासदारकीची धुरा सांभाळताच महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदियाच्या रेल्वे स्थानकांला एक नवी ओळख मिळवून देण्याचे प्रयत्न सातत्याने केल्यानेच आज अनेक विकास कामे या स्थानकावर झाल्याचे बघावयास मिळत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानक ‘अ’ वर्ग श्रेणी मध्ये असून या ठिकाणी दिव्यांग लोकांना तसेच वयोवृद्ध लोकांना प्लॅटफॉर्मवर जाण्या करीता पायऱ्या चढून प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागते. आत्ता नवीन पैदल पूल तसेच लिफ्टची सोय उपलब्ध झाली आहे. सामान्य नागरिकांकरीता लवकरच स्वयंचलित पायऱ्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस प्लेटफार्म क्र.1 वरुन सोडणे व लिफ्ट लोकार्पण सोहळ्याला एडीआरएम  अमित अग्रवाल,वरिष्ठ वाणिज्य प्रबंध अर्जुन सिब्बल,गोंदियातील अनेक मान्यवर उपस्थित होते.