सहाय्यक वनसरंक्षक अग्रवालांची होणार चौकशी

0
11

वनमंत्रीनी दिले सचिवांना चौकशीचे आदेश
अहेरी,दि.7:-बहूचर्चित आलापल्ली वन विभागाचे वादग्रस्त साहाय्यक वनसंरक्षक रवि अग्रवाल यांची चौकशी आता विकास खारगे सचिव वने हे करणार आहेत. त्याचे चौकशीचे आदेश सचिव वने यांना (दि.4मे)राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.दि.28 एप्रिलला वनमंत्रीनी अग्रवाल यांची चौकशी करण्याबाबत आदेश मुख्य प्रधान वनसंरक्षक नागपूर यांना दिले होते.पण सदर प्रकरण हे महिला समंधी असल्याने व मागील एका वर्षापासून वरीष्ठ अधिका-यांना या प्रकरणी सर्व माहिती असूनही अग्रवाल यांचेवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.असे आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी मलबार हिल मुंबई येथील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सह्याद्री अतीथीगृहात जाणवून त्यांचेशी या प्रकरणी सविस्तर चर्चा केली .प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी लागलीच (4 मे 17)सचिव वने यांना साहाय्यक वनसंरक्षक रवि अग्रवाल यांची स्वता चौकशी करुण आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत..आता अग्रवाल यांचे चौकशीला वेग येवून पीडीत महिलांना न्याय मीळेल व सत्य समोर येईल असा आशावाद आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी व्यक्त केला.त्यांच्या या तक्रारीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे सीएमओ कार्यालयानी घेतली आहे.व वनविभागाला योग्य चौकशी करण्याचे निर्देशदिले असल्याची माहिती विजय खरवडे यांनी दिली आहे.
साहाय्यक वनसंरक्षक रवि अग्रवाल हे आलापल्ली वनविभागात रुजू झाल्यापासून वादग्रस्तच ठरले आहेत.त्यांचे अधिनस्थ असलेल्या आलापल्ली व अहेरी वनक्षेत्रातील महिला कर्मचारीनी अग्रवाल यांचेवर अनेक आरोप करीत उपवनसंरक्षक आलापल्ली यांना लेखी तक्रार दिली होती.पण या पीडीत महिलांना अजूनपर्यंत कोणताही न्याय मीळाला नाही. काहिणी तर अग्रवाल यांचे त्रासाला कंटाळून आपले ईतरत्र स्थानांतरन करुन घेतले.अग्रवाल यांना वनविभागा कडून अभय मीळाल्याने त्यांची हिम्मत अधीक वाढुन ते कर्मचा-याना त्रासदायक ठरत आहेत.आलापल्ली वन विभागातील कर्मचारी अग्रवाल यांचे भीतीमुळे दबावाखालती काम करीत आहेत.
आलापल्ली वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक रवि अग्रवाल यांची तक्रार आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे सुध्दा दिली होती.त्यांचे या तक्रारीची दखल मुख्यमंत्रीचे सीएमओ कार्यालयानी पत्र क्र.2285298/17 नुसार घेतली आहे.याबाबतची माहिती विजय खरवडे यांनी दिली आहे.