रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते वडसा – गडचिरोली रेल्वेलाईनच्या कामाचे भूमिपुजन

0
13

गडचिरोली,दि.08- बहुप्रतिक्षीत असलेल्या वडसा – गडचिरोली या ५२. २ किमी रेल्वेलाईनच्या कामाचे भूमिपुजन उद्या उद्या ९ मे रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथे मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर करण्यात आले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी आज स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती सीतारामण शर्मा, मध्यप्रदेशचे शेतकरी कल्याण व कृषी विकास मंत्री गौरीशंकर बिसेन, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, राज्यमंत्री लालसिंह आर्य, राज्यमंत्री सूर्यप्रकाश मीना, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, खा. कमलनाथ, खा. अशोक नेते, ज्योती धुर्वे, खा. रामदास तडस, खा. आनंदराव अडसूळ, खा. कृपाल तुमाने, राज्यसभेचे खा. अजय संचेती, डाॅ. विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, आ. डाॅ. मिलींद माने, चैतराम मानेकर, सोहनलाल वाल्मिकी, नाना शामकुळे, डाॅ. पंकज भोयर, कृष्णा खोपडे, डाॅ. देवराव होळी, कृष्णा गजबे, बल्लारशा नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा, नगराध्यक्षा गीता यादव, लाजवंती नागले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्या ९ मे रोजी नागपूर येथे वडसा – गडचिरोली या रेल्वे मार्गासोबतच वर्धा – नागपूर, नागपूर – इटारसी, वर्धा – बल्लारशा या नवीन रेल्वेलाईनच्या कामांचे भूमीपुजन आॅनलाईन पध्दतीने पार पडणार आहे, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी दिली. पत्रकार परिषदेला गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई डोळस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जि.प. सदस्या मिनाताई कोडाप, जावेद सय्यद आदी उपस्थित होते.