ताडोबा,नागझिरा व कर्हांडला व्याघ्र प्रकल्पातील २5० गाईड संपावर

0
12

गोंदिया-चंद्रपूर,दि.13-महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पासह उमरेड कर्हांडलातील टुरिस्ट गाईड आजपासून दोन दिवसाच्या संपावर गेल्याने पर्यटकांची चांगलीच कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले. संबंधित टुरिस्ट गाईड आज आणि उद्या संपावर गेल्यामुळे पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे २5० च्याजवळपास गाईड या संपात सहभागी झाले आहेत. मानधनात वाढ आणि टुरिस्ट वाहनांची संख्या वाढवावी या मागण्यांसाठी त्यांनी हा संप केला आहे.गोंदिया जिल्ह्यातील चोरखमारा प्रवेशद्वार,पिटेझरी प्रवेशद्वार ,उमरेड कर्हांडला येथील प्रवेशद्वारावर या गाईडंनी शांततामय पध्दतीने आंदोलन करीत वन्यजीव विभागाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले आहे.हा संप उद्या रविवारलाही राहणार आहे.