रवी येथे वाघाने केले इसमास ठार

0
5

गडचिरोली,दि.13: आरमोरी तालुक्यातील रवी येथे वाघाने इसमावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज १३ मे रोजी घडली आहे. वामन मरापे असे वाघाच्या हल्लयात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. वामन मरापे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम व माजी आ. रामकृष्ण मडावी यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी पी. आर. तांबटकर यांच्याकडे केली आहे.