घाटटेमणी जि.प.क्षेत्रातील रस्त्यासांठी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

0
9

आमगाव,दि.31-ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देऊन ग्रामविकासात सहकार्य करण्यासंबधीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या निवदेनात केली आहे.हर्षे यांनी आमगाव तालुक्यातील घाटटेमणी जिल्हा परिषद मतदारसंघातील ९ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीसह निधीची मागणी केली आहे.त्या रस्त्यामध्ये भोसा-करंजी-कातुर्ली डांबरीकरण रस्ता,कालीमाटी -सुपलीपार डांबरीकरण रस्ता,घाटटेमणी-गिरोला-टाकरी-कामठा-आमगाव रोड रस्ता,गिरोली-मंगरुटोला डांबरीकरण रस्ता,कामठा-आमगाव ते बोदा-मंगरुटोला-गिरोला डांबरीकरण रस्ता,बोदा-भोसा डांबरीकरण रस्ता,कट्टीपार-गोसाईटोला रस्ता,कालीमाटी बसस्टाप ते टेकरी रस्ता व गिरोला -घाटटेमणी रस्ता ते कोल्हापुरी बंधारावरुन मध्यप्रदेशला जाणारा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.या रस्त्यावरुन मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असल्याने रस्ते खराब झाले आहेत.त्यामुळे सामान्य नागरिकासंह प्रवासानाही त्रास सहन करावा लागत असल्याचे हर्षे यांनी निवेदनात म्हटले आहे.