महाराष्ट्रव्यापी बंदला आमगाव सालेकस्यात प्रतिसाद

0
16
गोंदिया, दि. 5 – कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.गोंदिया जिल्हयात आमगाव व सालेकसा तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला.शेतकरी पंचायत,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,मराठा सेवा संघासह राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आदींनी मिळून या आंदोलनात सहभाग नोंदविला.तसेच मागण्याचे निवेदन सादर केले.या निवेदनात स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतकयाची पुर्ण कर्जमुक्ती करा,सात बारा कोरा करा आदी मागण्यांचा समावेश होता. आमगाव येथे निवेदन देतेवेळी शेतकरी पंचायतचे तुलेंद्र कटरे,धिरेश पटेल,हुकुमचंद बहेकार,कमलबापू बहेकार,क्रांती जायस्वाल,विजय रहागंडाले,रवी क्षिरसागर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.सालेकसा येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,मनोज डोये,तुकाराम बोहरे,मनोज शरणागत,प्रभाकर दोनोडे,अनिल फुंडे,वासुदेव फुंडे ,विजय फुंडे.गणेश बघेले,संजू बारसे,वैभव हेमने,योगेश फुंडे,विजय ठाकरे,मनोहर कटरे,बबलू टेंभरे,नेपाल पटले आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला. तसंच यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंब फाटा आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील भांबराजा येथे  चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यानं येथील वाहतूक ठप्प झाली होती.

अमरावती : आमदार यशोमती ठाकूर यांनी नोंदवला शेतकरी संपात सहभाग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर रास्तारोको करुन सरकारविरोधात केले आंदोलन.

वर्धा : शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी पोहणा येथे राष्ट्रीय महामार्गावर माजी आमदार राजू तिमांडे यांचे नेतृत्वात चक्का जाम आंदोलन. आंदोलनात कृ.ऊ.बाजार समितीचे संचालक विनोद वानखेडे, माजी पं. स.सदस्य दिवाकर वानखेडे, उपसरपंच राहुल वानखेडे यांच्यासह परिसरातील शकडो शेतक-यांचा सहभाग.

सोलापूर – सांगोला शहर तालुक्यात शेतकरी संपामुळे कडकडीत बंद, दुध संकलन, भाजीपाला, फळे विक्रीस न आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. बाजार समितीत भाजीपाला आवक मंद झाल्याने दुप्पट किमतीने विक्री सुरू दुध पंढरीचा बंद पाठिंबा असल्याने दुध संकलन बंद.

सांगली – जिल्ह्यातील बहुतांश गावात शेतकरी संपानिमित्त बंदला चांगला प्रतिसाद. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले. दूध रस्त्यावर ओतले. सावर्डेत रस्त्यावर टायर पेटवले. वाळला तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, कडेगाव तालुक्यातील वांगी, आसद, देवराष्ट्रे, जत तालुक्यातील वाळेखिंडी परिसरात कडकडीत बंद.

शिरपूर (वाशिम) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जनावरांना भाजीपाला खाऊ घालून केले गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन. शासनाविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी रोष केला व्यक्त केला.