चिमूर,दि.14- “पर्यावरण संवर्धन सामाजिक संस्था “चंद्रपुर च्या वतीने पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्या व्यक्तिंचा पुरस्कार सोहळा जि.प.कन्नमवार सभागृहात पार पडला.पर्यावरण संरक्षणाची चळवळ निर्माण करणे आणि पर्यावरण जनजागृतीसाठी परिश्रम घेऊन काम केल्याबद्दल कवडु लोहकरे यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याला चंद्रपुर महानगर पालिकेच्या महापौर अंजली घोटेकर,डी.के आरीकर,सभापती ब्रिजभुषन पाझारे, कुक्कु साहणी, राजेश सोलापन उपस्थित होते. लोहकरे यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.





