पर्यावरणाचे रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविल्या पाहिजे-न्या.माधुरी आनंद

0
10

गोंदिया,दि.१४ : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने आपल्या जीवनात प्लास्टीकचा एवढा वापर केला आहे की, मानवी जीवनावर प्लास्टीकचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्लास्टीक रस्त्यावर टाकल्यामुळे त्याचे गोमाता सेवन करतात व त्यापासून मिळणा?्या दुधाचा मानव वापर करतात व त्यामुळे मानवाच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करावयास पाहिजे. सध्याचे युगामध्ये वातानुकुलीत यंत्राचा वापर फार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. परंतू एसीमुळे निघालेल्या वायुचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा वकील संघ गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक युवराज यांनी केले. त्यांनी स्वच्छ हवा व पाणी मिळण्याकरीता वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना १९७२ पासून अस्तित्वात आली. पर्यावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाकरीता आपण स्वत:चे घरापासून सुरुवात करावी असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष टी.बी.कटरे यांनी सांगितले.
वन अधिकारी श्री.बडगे यांनी पर्यावरण म्हणजे मानवासोबत सजीवसृष्टी, आजुबाजूचे वातावरण, एकमेकांशी होणारी क्रिया होय. बाहेरचे तापमान वाढते तेव्हा माणूस बेचैन होते. प्रदूषणाविषयी कायदे स्व.इंदिरा गांधी यांनी आमलात आणले असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, सह दिवाणी न्यायाधीश पी.बी.भोसले व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास वनसंरक्षक श्री.मेश्राम, जिल्हा न्यायालय वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पीएलव्ही आशा ठाकूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार सहायक उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी मानले.यशस्वीतेसाठी एस.जी.कान्हे, जी.सी.ठवकर, डी.ए.थोरात, ए.जे.नंदेश्वर व एन.एच.शेन्डे यांनी सहकार्य केले.