23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ तालुका प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागणार-थुटे

तालुका प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागणार-थुटे

0
17

चिमूर,दि.16- तालुक्यातील बोथली येथे शेतशिवाराला असलेल्या  गजानन थुटे यांच्या शेतालगत मग्रारोहयोंतर्गत रस्त्याचे मातीकाम करण्यात आले.हे मातीकाम करतांना रस्त्यावरील पुर्ण पाणी शेतात येत असल्याने ते पाणी बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन टाकण्यास प्रशासनाच्यावतीने अडथळा निर्माण करण्यात येत असल्याची तक्रार थुटे यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.परंतु त्या तक्रारीकडे गेली वर्षभरापासून जिल्हा प्रशासनाने लक्षच दिले नसल्याचे समोर आले आहे.रस्त्यावरील पाणी शेतात येत असल्याने पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार करुन ते पाणी बाहेर काढण्यासाठी पाईप घालण्याची विनंती वजा मागणी केली परंतु त्याकडे साफ तालुका प्रशासन लक्ष द्यायला तयार दिसून येत नसल्याने न्यायालयात ग्रामसेवक व ग्रामरोजगारसेवकासह तालुकाप्रशासनाविरोधात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

गजानन थुटे यांची बोथली (व्हाणगाव) सांजा  क्र.१ येथे शेती असून सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतःची शेतातील जागा अर्धा किमी रस्त्यासाठी विना मोबदला उपलब्ध करुन दिले.त्या जागेवरच मग्रारोहयोतंर्गत रस्ता तयार करण्यात आला.परंतु पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सीडीवर्कद्वारे पाईप टाकण्याच्या मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी ,तहसीलदारांना मागील एक वर्षापासून देऊनही प्रशासनदुर्लक्ष केल्याने शेतातील कापूस ,सोयाबीन पिकाचे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे थुटे यांनी म्हटले आहे.ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीनेही थुटे यांची बाजू घेत पाईप टाकण्यास सहमती दर्शविल्यानंतरही तालुका प्रशासनाची भूमिका विकासात्मक धोरणाला आडकाठी होत असल्याने अशा अधिकारी वर्गावरही कारवाईची मागणी पुढे येऊ लागली आहे.