वेलगुर प्राथमिक आरोग्य केंद्रासा कुलूप,रुग्ण बाहेर

0
14

सुचित जम्बोजवार अहेरी,दि.18– गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अतिदुर्गम व मागास तालुका.त्या तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी तालुक्यातील वेलगूर येथील येथे आरोग्य प्राथमिक केंद्र सुरु करण्यात आले आहे.परंतु या आरोग्य केंद्रातच कुणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्णांना मात्र उपचाराअभावी ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. शनिवारला वेलगुरटोला येथील एका रुग्णाला त्याच्या नातेवाईंकानी बैलबंडीवर ठेवून उपचारासाठी आरोग्य केंद्रांत दुपारी 12.30 सुमारास आणले.परंतु त्या केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी हजर नसल्याने आरोग्य केंद्राच्या बाहेरील झाडाखालच्या सावलीत त्या रुग्णाला आरोग्य कर्मचारी व डाॅक्टरची वाट बघत थांबावे लागल्याची घटना समोर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील मागास भागातील आरोग्य विभागाचे कर्मचारी हे किती प्रामाणिक कार्य करीत असतील याचे उदाहरणच समोर आले आहे.